Ajit Pawar | महाविकास आघाडीकडे सर्वाधिक सरपंच आणि जागा ; अजित पवार यांचा दावा

Ajit Pawar | नागूपर : महाविकास आघाडीला ग्रामपंचायत निवडणुकीत ३२५८ सरपंच पदे तर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळाल्याची माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. भाजप आणि शिंदे गटाला ३०१३ सरपंच व इतर १३६१ आहेत. यामध्ये ७६१ हे महाविकास आघाडीशी संबंधित आहेत. महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाचे ४०१९ सरपंच निवडून आले आहेत. अशापद्धतीने महाराष्ट्रात सर्वाधिक जागा महाविकास आघाडीच्या ग्रामपंचायतीत निवडून आल्या आहेत, असा दावा अजित पवार यांनी केला आहे.

दरम्यान या ग्रामपंचायतींचे निकाल लागायच्या अगोदरच भाजप -शिंदे गटाच्या जास्त जागा आल्या, असे जाहीर केले ते धादांत खोटे होते. ग्रामीण भागातील जनतेने महाविकास आघाडीच्या पाठी पाठबळ उभे केले आहे असेही अजित पवार यावेळी म्हणाले. दरम्यान या आनंदाच्या क्षणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला.

तसचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप समर्थित उमेदवारांनी ३,५०० हून अधिक जागा जिंकल्या, तर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या समर्थकांनी १,००० हून अधिक जागा जिंकल्याचा दावा केला. काँग्रेसने भाजपचा हा दावा फेटाळून लावला आणि एकट्या काँग्रेसमधून सर्वाधिक ९०० सरपंच निवडून आल्याचे सांगितले. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. राऊतांच्या टीकेवर नितेश राणे यांनी टोला लगावला आहे.

“एक दिवस अगोदरच आम्हीच पहिल्या नंबरवर आहोत, असे म्हणणाऱ्या मंडळींनी राज्यातील त्यांचे सरपंच आणि सदस्य यांची यादी जाहीर करावी, म्हणजे प्रश्न मिटला. जोरात खोटे बोलल्याने काही काळ भ्रम निर्माण होईल. ग्राम पंचायत निवडणुका चिन्हावर लढत नाहीत. तेव्हा उगाच आकडा लावून काय करणारं?”, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.