Ajit Pawar | महाविकास आघाडीच्या मोर्चाला अद्यापही परवानगी नाही, अजित पवार म्हणाले…

Ajit Pawar | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे आणि सीमा प्रश्नावर सरकारने भूमिका न घेतल्याने  महाविकास आघाडीने राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. सोमवारी पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यांवर 17 डिसेंबर रोजी मुंबईतील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र या मोर्च्याला अद्याप परवानगी मिळाली नाही. यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

परवानगी नाकारली तरी आम्ही मोर्चा काढणार, असा निर्धार अजित पवार यांनी केला आहे. अजित पवार म्हणाले, “अशा मोर्चांना सहसा पोलीस परवानगी देत नसतात. सरकार कोणाचंही असलं तरी अशा प्रकारे मोर्चे जसे येतात. तेव्हा परवानगी दिलेली नसले तरी मोर्चे काढणारे मोर्चे काढत असतात. लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. परवानगी मागण्याचा आम्हाला अधिकार आहे. परवानगी नाकारायची की द्यायची तो सरकारचा अधिकार आहे. पण आम्ही मोर्चा काढणार आणि सहभागी होणार.”

छगन भुजबळ म्हणाले, “मोर्चाला परवानगी दिलीच पाहिजे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे. अशा पद्धतीने राजकरण सुरु आहे, त्यामुळे वाटत कि राज्यात अघोषित इमर्जन्सी सुरू आहे. महापुरुषांवर होणाऱ्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ मोर्चा आहे. महाराष्ट्रातून इतर राज्यात उद्योग जात आहेत, त्या विरोधात मोर्चा आहे. त्यामुळे कारवाई झाली तरीही चालेल मोर्चा निघणार.”

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed.