Ajit Pawar | “मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…”; ‘त्या’ ट्विटमुळं चर्चांना उधाण

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे. मात्र, रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे अजित पवारांनी वाढदिवस साजरा करणार नसल्याचं सांगितलं आहे.

परंतु, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. त्याचबरोबर कालपासून अजित पवार यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स आणि होल्डिंग जागोजागी लावण्यात आले आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी एक ट्विट केलं आहे. त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अमोल मिटकरी यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक व्हिडिओ शेअर केला आहे. ट्विट करत अमोल मिटकरी म्हणाले, “मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की… लवकरच #अजितपर्व.”

अमोल मिटकरी यांच्या या ट्विटवर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहे. त्याचबरोबर यामुळे राज्याच्या राजकारणात नवीन भूकंप पाहायला मिळणार का? अशा चर्चा देखील रंगल्या आहे.

Eknath Shinde has suddenly left Mumbai for Delhi

दरम्यान, काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अचानक मुंबईहून दिल्लीला रवाना झाले आहे. दिल्ली दौऱ्यादरम्यान ते  भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं (Ajit Pawar) जात आहे. मुख्यमंत्री शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्याने उर्वरित मंत्रिमंडळ विस्ताराला वेग येणार का? या चर्चा सुरू झाल्या आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3Y2r1FA