Ajit Pawar | मी जाहिरातबाजी करणारा नेता नाही; अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला

Ajit Pawar | नाशिक: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं  आणि जाहिरातबाजीचं नातं सर्वांनाच माहित आहे. जाहिरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच रंगलं होतं. याच प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाशिकमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

I am not an ad or a show leader – Ajit Pawar

माध्यमांशी बोलत असताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “मी जाहिरातबाजी किंवा शो करणारा नेता नाही. आजच्या वर्तमानपत्रात बाहेरच्या नेत्यांनी जाहिराती छापल्या आहे. त्याचबरोबर नाशिक शहरामध्ये कार्यकर्त्यांनी बॅनर्स लावले आहेत. परंतु, आपल्या जाहिराती बाहेरच्या राज्यात लावल्या जात नाही.”

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये बॅनर्स लावण्यात आले आहे. या बॅनर्सवरती शरद पवारांचा फोटो लावलेला नाही. या प्रश्नाचं उत्तर देत अजित पवार म्हणाले, “शरद पवार आमचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे बॅनर्सच माहीत नाही. मात्र, त्यांचा फोटो मी माझ्या केबिनमध्ये लावला आहे.”

यावेळी बोलत असताना अजित पवारांनी (Ajit Pawar) नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) तोंड भरून कौतुक केल्याचं दिसलं आहे. ते म्हणाले, “भारतामध्ये नरेंद्र मोदी यांच्यासारखं नेतृत्व कुठं पाहायला मिळणार नाही आणि हे सर्वांना मान्य करावे लागेल.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या नऊ वर्षात अनेक विकास काम झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून सरकारनं जनतेला एक उत्कृष्ट सुविधा पुरविली आहे. सरकारमध्ये ताकतीचा प्रश्न नाही. आम्ही सर्वजण एक परिवार म्हणून काम करत आहोत”, असही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/43vUHvY

You might also like

Comments are closed.