Ajit Pawar | मी राजकारणातून संन्यास घेण्याचा विचार करतोय, अजित पवारांचा बावनकुळेंना टोला
Ajit Pawar | नागपूर : माझ्या बारामती दौऱ्यामुळेच अजित पवार इतके प्रभावित झाले की ते माझा करेक्ट कार्यक्रम करायला निघाले, कोण कोणाचा योग्य कार्यक्रम करणार, हे जनता २०२४ मध्ये सांगेल. २०२४ च्या निवडणुकीत महाविकास आघाडीला उमेदवारही मिळणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
एक दिवसापूर्वीच विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बावनकुळे यांच्या बारामती दौऱ्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याचे वक्तव्य केले होते. दरम्यान बावनकुळेंच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले, “एवढा मोठा ताकदीचा नेता मला आव्हान देत आहे. हे ऐकून मी घाबरलो. आमच्या सर्वांची झोप उडाली आहे. मी राजकारणातून संन्यास घेण्याचा विचार करतोय. बावनकुळे यांच्या म्हणण्यानुसार २०२४ मध्ये होणा-या पराभवामुळे अपमानित होण्यापेक्षा मला राजकारण सोडलेले बरे असे वाटते.”
महत्वाच्या बातम्या :
- Rahul Dravid | राहुल द्रविडची क्रिकेट कोच कारकीर्द संपणार?, BCCI ने आखला नाव प्लॅन
- Health Care Tips | सोयाबीनचे नियमित सेवन केल्याने मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे
- Eknath Shinde | सीमावर्ती गावातील एक इंचही जमीन देणार नाही; कर्नाटकने आव्हानाची भाषा करू नये – एकनाथ शिंदे
- ICC Award 2022 | ‘इमर्जिंग क्रिकेटर’ पुरस्कार यादीमध्ये अर्शदीप सिंगचे नाव, करणार ‘या’ खेळाडूंसोबत स्पर्धा
- Health Care | सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय आहे जायफळ, कसा करायचा वापर? जाणून घ्या
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.