Ajit Pawar | “… म्हणून ते अशी विधानं करत असावेत”, अजित पवारांचा राज्यपालांबाबत संशय

Ajit Pawar | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरुन अनेक नेते आक्रमक झाले असून राष्ट्रवादी (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना त्यांनी संशय व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे राज्यपालांना पदावरुन हटवण्याची मागणी करण्यात येतं आहे.

राज्यपालांनी शिवरायांबाबत जे वक्तव्य केलं, ते राज्यातील कोणालाही चीड येईल, अशा प्रकारचं होतं. त्या वक्तव्याचा मी पण निषेध नोंदवला होता. मी आजही त्याचा निषेध करतो. मात्र, ते वारंवार असं का वागतात, असं का बोलतात? हे महाराष्ट्राला पडलेलं कोडं आहे, असं अजित पवार म्हणाले.

मी सुद्धा उपमुख्यमंत्री असताना राज्यपालांना अनेकदा भेटायला जात होतो. तेव्हा ते नेहमी मला म्हणायचे ‘अजितजी बस्स मुझे नही रहना यहाँ, मुझे जाना है’ तेव्हा मी त्यांना म्हणायचो की, वरिष्ठांना सांगा आणि जा, त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातून जायचं असेल म्हणून ते अशी विधानं करत असावेत, असा माझा अंदाज आहे, असेही ते म्हणाले. ज्याप्रकारे काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना बदली हवी असेल तर काही वेडं वाकडं काम करतात आणि त्यानंतर त्यांची बदली केली जाते, तसं काही मनात आहे का, अशी शंका मला वाटते, असा अंदाज पवारांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, राज्यपालांनीही जे वक्तव्य केलं आहे, मला एवढचं म्हणायचं आहे. राज्यपालांच्या विचारामधला अंधार दूर होऊ दे, त्यांच्या वक्तव्यामधला गोंधळ संपू दे, महाराष्ट्राच्या राज्यपालांना सद्बुद्धी लाभू दे अशी प्रार्थना मी करतो, असं देखील अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.