Ajit Pawar | “या” ट्विटनंतर अजित पवार भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला पुर्णविराम
Ajit Pawar | मुंबई : काल (13 मे) कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. यामध्ये काँग्रेसला ( Congress) बहुमत मिळवत भाजपचा पराभव केला आहे. 224 जागांच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 113 हा बहुमताचा आकडा आहे. यामुळे भाजपची (BJP) खिल्ली उडवली जात असल्याचं पाहायला मिळतं आहे. तर गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या त्या चर्चना पूर्णविराम मिळालेला पाहायला मिळतं आहे. अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर
सूचक ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवारांनी काय ट्विट केलं (Ajit Pawar Commented On BJP)
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटकामधील निकालाची महाराष्ट्रातही पुनरावृत्ती होईल, असं अजित पवार यांनी ट्विटमध्ये केलं आहे. तर त्यामध्ये म्हटलं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मित्रपक्षांची महाविकास आघाडी महाराष्ट्रातही याची पुनरावृत्ती करेल. लवकरच महाराष्ट्रात देखील अशीच लढाई पाहायला मिळेल. कारण महाराष्ट्रातील जनतेनं तसा निर्धार आधीच केला आहे. कर्नाटकातील मतदार, काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन! असं ट्विट केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मित्रपक्षांची महाविकास आघाडी महाराष्ट्रातही याची पुनरावृत्ती करेल. महाराष्ट्रातील जनतेनं तसा निर्धार आधीच केला आहे. कर्नाटकातील मतदार, काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!#KarnatakaElectionResults2023
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 13, 2023
दरम्यान, अजित पवार यांनी पुढे असं म्हटलं आहे की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला दिलेला कौल हा कर्नाटक आणि देशाच्या राजकारणाची वाटचाल पुन्हा एकदा विकास आणि लोकशाही मजबूत करण्याच्या दिशेनं सुरु झाल्याची नांदी आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानं भाजपची दक्षिणेकडील पुरती नाकाबंदी केली आहे. अस ट्विट करता टोलाही अजित पवार यांनी भाजपला लगावला. तर त्यांच्या या ट्विटमुळे अजित पवार भाजपमध्ये जाणार या चर्चना पूर्णविराम मिळाला असल्याचं बोललं जातं आहे. तर आगामी निवडणूकिसाठी महाविकास आघाडीची पुढची काय रणनीती असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- Amruta Fadnavis । “कर्नाटक निवडणूक नाही जिंकली, तरी लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदीचं जिंकतील” : अमृता फडणवीस
- Aditya Thackeray | सत्तासंघर्षाच्या निकालानंतर आदित्य ठाकरे दिल्लीत ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- Sharad Pawar | कर्नाटकमधील राष्ट्रवादीच्या पराभवावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Uddhav Thackeray | “हा देशातील हुकूमशाहीचा पराभव…”; कर्नाटक निवडणूक निकालावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
- Karanatka Election Result | हा लढा भ्रष्टाचाराविरोध होता : विजयानंतर डीके शिवकुमार यांची प्रतिक्रिया
Comments are closed.