Ajit Pawar | राज्याच्या राजकारणात पुन्हा येणार मोठा भूकंप? अजित पवारांनी मारला डोळा

Ajit Pawar | नाशिक: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक दौऱ्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमापूर्वी अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना त्यांनी पुन्हा एकदा डोळा मारला आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

विरोधी पक्ष नेते असताना विधिमंडळात अजित पवार (Ajit Pawar) पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आल्यानंतर अजित पवारांनी डोळा मारला होता. आता पुन्हा एकदा अजित पवारांनीही कृती केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्या चर्चा सुरू झाले आहे.

Will NCP claim party and symbol?

अजित पवार गट (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि चिन्हावर दावा करणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “याबाबत तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला याबद्दल काहीच काळजी करण्याची गरज नाही. स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर कोणत्याही निवडणुकीत एबी फॉर्म भरताना पक्षाचे नाव आणि चिन्ह द्यावे लागतं.

तोपर्यंत या सर्व गोष्टींबाबत तुमच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडलेला असेल.” एवढं बोलून झाल्यानंतर अजित पवारांनी डोळा मारला. त्यांच्या या कृत्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना अजित पवारांनी (Ajit Pawar) उद्धव ठाकरेंना बघून डोळा मारला होता. विधिमंडळात विरोधी पक्षनेते असताना अजित पवार पत्रकारांशी संवाद साधत होते.

त्यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे त्या पत्रकार परिषदेत हजर झाले. ठाकरेंच्या आगमनानंतर अजित पवारांनी पत्रकारांकडे बघून डोळा मारला होता.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3XZghYM