Ajit Pawar | राज्यात आणखी एक राजकीय भूकंप येणार? अजित पवार सर्व आमदार घेऊन निघाले शरद पवारांच्या भेटीला

Ajit Pawar | मुंबई: अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच नाट्यमय झालं होतं. त्यानंतर आता अजित पवार सर्व आमदारांसह शरद पवारांच्या भेटीस गेले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आलं  आहे.

Ajit Pawar along with all his MLAs has arrived in Yashwantrao Chavan to meet Sharad Pawar

आज (17 जुलै) यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट होणार आहे. काल देखील अजित पवार आणि त्यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली.

तर आज अजित पवार आपल्या सर्व आमदारांसह यशवंतराव चव्हाणमध्ये शरद पवारांच्या भेटीस दाखल झाले आहे. त्यांच्या या भेटीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र राजकीय वर्तुळात त्यांच्या या भेटीबाबत तर तर्क-वितर्क लावले जात आहे.

काल अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार यांची न सांगता भेट झाली होती. तर आज पुन्हा एकदा यांच्यात बैठक होणार आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या या बैठकीला रोहित पवार (Rohit Pawar) आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) देखील उपस्थित राहणार आहे. त्यांच्या या बैठकीनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा नवा भूकंप येणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहे.

दरम्यान, आज आणि उद्या (17 जुलै आणि 18 जुलै) कर्नाटकच्या बंगळूर शहरामध्ये विरोधी पक्षाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला न जाता शरद पवार अजित पवारांची (Ajit Pawar) भेट घेण्यासाठी मुंबईतच थांबले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगल्या चर्चा रंगल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3PZTdak