Ajit Pawar | “राज्यात सर्व जाती-धर्माचे लोक…”; त्र्यंबकेश्वर प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं  आहे. या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एसआयटी स्थापन केली आहे. मात्र, या सर्व प्रकरणावर अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदानं राहतात, असं अजित पवार म्हणाले आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये झालेल्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “त्र्यंबकेश्वरमध्ये झालेल्या घटनेबाबत काही संघटना समोर आल्या आहे. तिथं कोणी गोमूत्र शिंपडलं, तर तिथे कुणाला काय शिंपडायचं आहे ते शिंपडा. तुम्हाला त्याचा अधिकार आहे. राज्यामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदानं राहतात. आपणही अजमेरला चादर चढवायला जात असतो.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “त्र्यंबकेश्वरमधील आमदारांनी आणि स्थानिक लोकांनी मला फोन करून सांगितलं. ती शंभर वर्ष जुनी परंपरा आहे. धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी अशा गोष्टी जाणीवपूर्वक घडवून आणल्या जात आहे. सोशल मीडियाचा वापर करून या गोष्टी घडवल्या जात आहे. हे सगळं ताबडतोब थांबलं पाहिजे.”

“काही राजकीय पक्षाचे प्रवक्ते आणि नेते राज्यातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर राज्यामध्ये धार्मिक तेढ कसा निर्माण होईल, हा देखील प्रयत्न करतात,” असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3Is1DT4

You might also like

Comments are closed.