Ajit Pawar | राज ठाकरे, शिंदे, फडणवीस भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

 Ajit Pawar | मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या संकल्पनेतून गेल्या 10 वर्षांपासून शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सव कार्यक्रम साजरा केला जातो. यंदाही मनसेने शिवाजीपार्कवर दीपोत्सव कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देखील उपस्थित होते. एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे तिघं एकाचवेळीसोबत असल्यामुळे, राजयकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अजित पवार (Ajit Pawar)

भाजपा, शिंदे गट आणि मनसे यांची महायुती होणार का?, अशी चर्चा सध्या राज्यात सगळीकडे सुरू आहे. याबाबत अजित पवार यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी एकत्र येऊ नये का? तुम्हाला वाईट का वाटतंय? दिवाळीच्या काळात सगळ्यांनी एकत्र यावं. शुभेच्छा द्याव्यात. त्यात आक्षेप घेण्याचं काय कारण आहे?, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

तसेच, पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, योजना राबवत असताना त्याचं व्यवस्थित नियोजन करावंच लागतं. नियोजनशून्य कारभार केला, की अशा समस्या निर्माण होतात. काही गोष्टी आहेत, काही नाहीत. दिवाळी झाल्यानंतर सवलतीच्या दरातला शिधा मिळाला तर त्याचा काय उपयोग आहे? त्यांचे मंत्री सांगतायत की पोहोचलाय. पण अजिबात पोहोचलेला नाही. काहींनी सांगितलं की त्याचा काळा बाजार सुरू आहे. 100 रुपयांमधला शिधा कुणी 200 किंवा 300 रुपयांना विकत आहे. हे चुकीचं आहे. त्यात बारकाईनं लक्ष देण्याची गरज आहे.

दरम्यान, राज ठाकरे, शिंदे, फडणवीस भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनीही भाष्य केलं आहे. भाजप आणि मनसे पक्षामध्ये युती आहे का ? छुपी युती असेल तरी जगजाहीर करा आणि युती झाली नसेल तरी जगजाहीर करा, असं म्हणत रूपाली ठोंबरे यांनी एकप्रकारे आवाहनंच दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.