Ajit Pawar | “लावणीच्या नावावर अश्लील नृत्य नको, वेळ पडली तर…”; अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

Ajit Pawar | मुंबई : महाराष्ट्राची संस्कृती म्हणून लावणीकडे पाहिलं जातं. आपली कला सादर करताना आजकाल संस्कृतीचं भान विसरुन आपल्या कलेचं प्रदर्शन करतात. अश्लिल चाळे करत डान्स करणं ही लावणी नाही. यावरुन मध्यांतरी गौतमी पाटीलच्या नृत्यावरुन राजकारणासह सर्वच क्षेत्रातून संतापाची लाट उसळली होती. त्यातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यात होणाऱ्या अश्लील लावणी नृत्य कार्यक्रमांवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

“अर्थसंकल्पीय अधिवेशनात विषय मांडू” (Ajit Pawar)

अजित पवारांनी ‘वेळ पडली तर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विषय मांडू’, असा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी असे अश्लील नृत्याचे कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून आयोजित होत असतील त्यांनाही सूचना दिल्या जातील, असंही अजित पवारांनी सांगितले आहे. ते बुधवारी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

“हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कमीपणा आणणारं आहे. महाराष्ट्राची लावणीची एक परंपरा आहे. आपल्या इथं चालणारे लावणीचे कार्यक्रम सर्वांना पाहता येतील असे झाले पाहिजे. त्यात अश्लील प्रकार व्हायला नको. दुर्दैवाने काही जिल्ह्यांमध्ये अशा कार्यक्रमांना बंदी आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये ते चालू आहे. नक्की वस्तूस्थिती काय आहे याबाबत मी संबंधितांशी बोलणार आहे. तसेच वेळ पडली तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा विषय मांडू.”

“ती परंपरा टिकली पाहिजे”

“महाराष्ट्राची एक उच्च परंपरा आहे. पहिल्यापासून आपल्या वडिलधाऱ्यांनी एक परंपरा निर्माण केली आहे. ती परंपरा टिकली पाहिजे. त्यामुळे कोणी चुकीचं वागत असेल, तर त्याला पायबंद घातला पाहिजे, अशी माझी आग्रही भूमिका आहे. तो विषय मी अर्थसंकल्पात मांडेन,” असे मत अजित पवारांनी सांगितले आहे.

अजित पवारांच्या जिल्हाध्यक्षांना सूचना (Ajit Pawar Notice to District President)

“अनेकदा असे कार्यक्रम होतात आणि त्या कार्यक्रमात पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचा फलक असतो. हे आम्हाला अजिबात मान्य नाही. अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रम करता कामा नये. तशा सूचना राष्ट्रवादी पक्षांच्या सर्व जिल्ह्यांच्या अध्यक्षांना देणार आहोत,” असेही अजित पवारांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-