Ajit Pawar | “वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत येणार का?”; अजित पवार म्हणाले,

Ajit Pawar | पुणे : राज्यातील राजकारणात रोजच नवीन ट्विस्ट बघायला मिळत आहे. अशातच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती होण्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. प्रकाश आंबेडकरांनी तर शिवसेनेकडे युतीचा प्रस्तावही दिला होता. मात्र, शिवसेनेने या प्रस्तावावर कोणतंही भाष्य केलेलं नव्हतं. त्यामुळे वंचित आणि ठाकरे गटाची युती होणार का? अशी चर्चा सुरू असतानाच प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकाच मंचावर आले. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत युतीचे संकेतही दिले.

प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गट आणि आम्ही निवडणूक जाहीर झाली तर एकत्र येऊ असं म्हटलं. त्यामुळं शिवसेना ठाकरे गट आणि वंचितची युती झाल्यास मविआचं काय होणार? असा सवाल विचारला जात होता. यावर अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चेला तयार असल्याचं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.

अजित पवार म्हणाले, “मतांची विभागणी टाळण्यासाठी समविचारी पक्षांबरोबर येण्याची आमची तयारी आहे. मात्र, दोन्हीबाजूने तयारी असावी लागते. राज्यात आंबडेकर गट, गवई गट, कवाडे गट, आठवले गट आहेत. यातील अनेकांबरोबर आघाडी करून निवडणुका लढल्या आहेत.”

त्याचबरोबर रामदास आठवले तिकडे जाऊन मंत्री होई पर्यंत आम्ही सोबत निवडणुका लढवल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आमच्या त्या त्यावेळच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केली होती. दिवंगत नेते आर. आर. पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली होती. त्याबद्दल त्यांनी तशी माहिती दिली होती, असंही अजित पवार यावेळी बोलताना म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.