Ajit Pawar | शरद पवारांच्या निर्णयाला फक्त अजित पवारांचा पाठिंबा, म्हणाले…
Ajit Pawar | मुंबई: शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. फक्त अजित पवार त्यांच्या या निर्णयाच्या पाठीशी असल्याचे दिसून आलं आहे. अजित पवारांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना या निर्णयाचं महत्त्व समजावून सांगितलं आहे.
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “तुम्ही सगळे गैरसमज करून घेत आहात. पवार साहेब अध्यक्ष नाहीत म्हणजे ते पक्षात नाही असं नाही. साहेब निवृत्त जरी होत असले, तरी ते पक्षासाठी कायम हजर राहणार. साहेबांच्या वयाचा विचार करत आपण ही जबाबदारी दुसऱ्या नेतृत्वाकडे देत आहोत. हे नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच काम करणार आहे.”
पुढे बोलताना ते (Ajit Pawar) म्हणाले, “शेवटी साहेब म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. पवार साहेबांनी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या जो कोणी पक्षाचा अध्यक्ष होईल तो पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच काम करेल.”
दरम्यान, पवारांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत. पवार साहेबांनी हा निर्णय मागे घ्यावा नाहीतर आम्ही सभागृह सोडणार नाही अशी मागणी केली . त्याठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक कार्यकर्तेच्या डोळ्यात पाणी होत. तर धनंजय मुंडे यांनी पवारांचे पाया पडून हा निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. तसचं पवारांसमोर अनेक नेत्यांना अश्रू अनावर झाले आहेत. ‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार’ अशा घोषणा देण्यात आल्या. यामुळे सभगृहात मोठा गोंधळ उडला आहे. पवारांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात देखील चर्चना उधाण आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal | ”तुमचा राजीनामा आम्ही नामंजूर करतो” : छगन भुजबळ
- Sharad Pawar | राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षांची निवड करणार ‘ही’ समिती, पाहा सदस्यांची नावं
- Sharad Pawar | राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याच्या शरद पवारांच्या निर्णयाला कार्यकर्त्यांचा विरोध ; म्हणले आम्ही…
- Jayant Patil | शरद पवार यांच्या निवृत्तीवर जयंत पाटील भावूक
- Sharad Pawar | शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणार, पवारांनी केला मोठा खुलासा
Comments are closed.