Ajit Pawar | शरद पवारांना पुन्हा एक धक्का! पवारांचा आणखीन एक शिलेदार अजित पवार गटात सामील
Ajit Pawar | नाशिक: अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले. यामध्ये काही नेते अजित पवारांसोबत गेले तर काही शरद पवारांसोबत (Sharad Pawar) गेले. मात्र, आमदार सरोज अहिरे यांनी आपली भूमिका जाहीर केली नव्हती. त्यामुळे सरोज अहिरे (Saroj Ahire) कुणाला पाठिंबा देतील? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.
I have decided to go with Ajit Pawar – Saroj Ahire
अजित पवार (Ajit Pawar) आज नाशिक दौऱ्यावर आहे. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान सरोज अहिरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माध्यमांशी संवाद साधत असताना सरोज अहिरे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमदार म्हणून अजित पवारांचा स्वागत करणे हे माझं कर्तव्य आहे.
शरद पवार हे मला वडिलांसारखे आहे तर अजित दादांनी मला नेहमी भावासारखा प्रेम दिलं आहे. त्यामुळे कुणाला पाठिंबा द्यावा? हे मला कळत नव्हतं. मात्र, हा कठीण निर्णय मी घेतलेला आहे. मतदारसंघातील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. मी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, सरोज अहिरे यांच्या या निर्णयानंतर शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) गट दिवसेंदिवस मजबूत होत चालला आहे. मंत्रिमंडळ खातेवाटपामध्ये अजित पवार गटाला महत्त्वाची खाती मिळालेली आहे. यामध्ये अजित पवारांना अर्थ खात देण्यात आलं आहे.
दरम्यान, शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी अजित पवार (Ajit Pawar) नाशिक शहरामध्ये दाखल झाले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमादरम्यान नाशिक शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते शक्तिप्रदर्शन करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | लोकप्रिय नेत्यांच्या सभांसाठी माणसं जबरदस्तीनं आणली जातात; संजय राऊतांची राज्य सरकारवर खोचक टीका
- Ajit Pawar | अजित पवार मैदानात! नाशिकमध्ये करणार जोरदार शक्तिप्रदर्शन
- Uddhav Thackeray | बेरीज, कूटनीती व किरकोळ गोष्टी…दोन वांझ भाषणे; ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल
- Ajit Pawar | अजित पवारांना अर्थ खात, तर गटातील इतर नेत्यांना मिळाले ‘हे’ खाते
- Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीसांची कूटनीती आपल्याला कुटून टाकायची – उद्धव ठाकरे
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3rvzdlP
Comments are closed.