Ajit Pawar | शरद पवारांनी ठरवलं तर अध्यक्ष होणार का? अजितदादा काय म्हणाले?

Ajit Pawar | मुंबई : गेल्या दोन दिवसांपूर्वी शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी चार जणांच्या नावाची चर्चा होत आहे. तर दुसऱ्या बाजूला पवारांचा वारसा सुप्रिया सुळे ( Supriya Sule) किंवा अजित पवार ( Ajit Pawar) यांच्याकडे जाणार की, युवानेतृत्व म्हणून रोहित ( Rohit Pawar) पवारांकडे अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार असा सवाल देखील विचारण्यात येत आहे. जेव्हा शरद पवारांनी घोषणा केली त्यावेळी कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून हा निर्णय मागे घावा अशी मागणी करण्यात येत होती. परंतु यामध्ये अजित पवार मात्र वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. यामुळे माध्यमांनी अजित पवारांना प्रश्न विचारला की, तुम्हाला अध्यक्षपद हवं आहे का? जर शरद पवारांनी आग्रह धरला तर ती जबाबदारी स्वीकाराल का? या प्रश्नाबाबत अजित पवारांनी उत्तरं दिल आहे.

काय म्हणाले अजित पवार ( What did Ajit Pawar say)

माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, जरी शरद पवार साहेबांनी माझ्यावर ती जबाबदारी सोपवली तरीही मला यामध्ये रस नाही. त्याचा विचारदेखील मी अजूनही केलेला नाही. अरे बाबांनो मग माझ्या अध्यक्ष होण्याचा प्रश्न येतो कुठून? स्पष्टपणे सांगायचं झालं तर मी अध्यक्ष होणार नाही. अशा शब्दात अजित पवार यांनी आपली भूमिका सांगितली आहे. ते मुंबईमधील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान च्या बाहेर राष्ट्रवादीच्या युवक- युवतींनी जो काही तळ ठोकून बसले आहेत त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आले असताना त्यांनी माध्यमांना असं उत्तर देत म्हंटलं आहे.

दरम्यान, ‘लोक माझे सांगती’ या शरद पवारांच्या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या कार्यक्रमादरम्यान पवारांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, नवीन अध्यक्षपदी कोण असणारं हे अजूनतरी निर्णय झालेला नाही. त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्या समितीच्या बैठकीत जो काही निर्णय होईल तो मला मान्य असेल. त्यानंतर शरद पवार यांच्या या निर्णयाचा कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून विरोध करण्यात आला. तर कार्यकर्तेनी आंदोलन करत पवार साहेबांनी हा निर्णय माघारी घ्यावा अशी मागणी केली. तर आता सर्वांच लक्ष उद्या म्हणजेच 5 मे ला होणाऱ्या समितीच्या बैठकीतुन काय निर्णय घेतला जातो? कोण असेल राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी? याकडे लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-