Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे.
यामध्ये शरद पवार गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सात आमदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा जाहीर केला आहे.
नागालँडमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सात आमदार निवडून आले होते. या सर्व आमदारांनी अजित पवारांना (Ajit Pawar) पाठिंबा दर्शवला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर शरद पवार यांना राष्ट्रीय पातळीवर मोठा धक्का बसलेला असून त्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
Seven MLAs from Nagaland have released an affidavit in support of Ajit Pawar
नागालँडमधील या आमदारांनी प्रतिज्ञापत्र प्रसिद्ध करत अजित पवारांना पाठिंबा दर्शवला आहे. “नागालँडमधील राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा आणि विचारमंथन करून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) व राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्या नेतृत्वाखाली याठिकाणी पक्ष मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे”, असं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, नागालँडमधील आमदारांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर प्रफुल्ल पटेल आनंद व्यक्त करत प्रदेशाध्यक्षांना मार्गदर्शन करण्याचं आश्वासन दिलं आहे.
त्याचबरोबर यावेळी त्यांनी त्यांना पक्ष मजबूत करण्याच्या सूचना देखील दिल्या आहे. नागालँडमधील राष्ट्रवादीच्या आमदारांनी घेतलेल्या या निर्णयानंतर अजित पवार (Ajit Pawar) गट मजबूत झाल्याचं दिसून आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde | “इर्शाळवाडी दुर्दैवी घटनेत 12 जणांचा मृत्यू तर…”; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती
- Aditya Thackeray | सरकारला ही दुर्घटना टाळता आली असती असं वाटतं का? इर्शाळवाडी घटनेवरून आदित्य ठाकरेंचा सवाल
- Ajit Pawar | माझा वाढदिवस साजरा करू नका; इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर अजित पवारांची घोषणा
- Nana Patole | “विरोधात असताना छगन भुजबळांचा घसा कोरडा व्हायचा आणि आज…”; नाना पटोलेंचा छगन भुजबळांवर घातक वार
- Jitendra Awhad | मी घरं बांधून दिली तशी तुम्ही देणार का? इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर जितेंद्र आव्हाडांचा राज्य शासनाला खडा सवाल
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3O3PwgW