Ajit Pawar | शरद पवार निर्णयावर ठाम ! अजित पवारांनी केला खुलासा

Ajit Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते भावूक झाले आहे. पवारांनी आपला हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती देखील पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. अशाच शरद पवारांनी अंतिम निर्णय देण्यासाठी कार्यकर्त्यांना दोन ते तीन दिवसाचा वेळ मागितला आहे.

पत्रकारांशी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “आपण सगळे पवार साहेबांना दैवत मानतो. त्यांना अंतिम निर्णय घेण्यासाठी दोन ते तीन दिवस वेळ हवा आहे. त्यांना वेळ विचार करायला वेळ द्या. त्यांच्या या निर्णयाचा मान राखून सर्वांनी त्यांना दोन ते तीन दिवस विचार करायला वेळ दिला पाहिजे.”

पुढे बोलताना ते म्हणाले (Ajit Pawar), “हट्टीपणा सोडा आणि साहेबांना विचार करायला वेळ द्या. तुम्ही जोपर्यंत घरी जात नाही, उपोषण जोपर्यंत थांबवत नाही तोपर्यंत पवार साहेब अंतिम निर्णय देणार नाही. कार्यकर्त्यांपेक्षा पवार साहेब जास्त हट्टी आहेत. त्यांना हट्ट करायला भाग पाडू नका. पवार साहेबांना विचार करायला वेळ द्या.”

दरम्यान, शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. फक्त अजित पवार त्यांच्या या निर्णयाच्या पाठीशी असल्याचे दिसून आलं आहे. अजित पवारांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना या निर्णयाचे महत्त्व समजावून सांगितलं आहे. अजित पवार म्हणाले, “तुम्ही सगळे गैरसमज करून घेत आहात. पवार साहेब अध्यक्ष नाहीत म्हणजे ते पक्षात नाही असं नाही. साहेब निवृत्त जरी होत असले तरी ते पक्षासाठी कायम हजर राहणार. साहेबांच्या वयाचा विचार करत आपणही जबाबदारी दुसरे नेतृत्वाकडे देत आहोत. हे नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच काम करणार आहे.”

महत्वाच्या बातम्या