Ajit Pawar | शिंदे गट कामाख्या देवीच्या दर्शनाला कुणाचा बळी देणार काय माहित? – अजित पवार

Ajit Pawar | पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पुन्हा एकदा 39 आमदारांसह गुवाहाटीला जाणार आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार पडल्यानंतर आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच आसाममध्ये येणार आहेत. या वृत्तानंतर गुवाहाटीमध्ये खळबळ उडाली आहे. यासाठी त्यांनी  पर्यटन विकासासाठीच्या दौऱ्याचं कारण सांगितले आहे. दरम्यान विरोधक त्यांच्या दौऱ्यावर टीका करत आहेत. विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील शिंदेंना टोला लगावला आहे.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “मला एक बातमी पत्रकार मित्रांनी दिली. गेल्यावेळी शिंदे गट गुवाहाटीला गेले तेव्हा तिथल्या हॉटेलचे बिल द्यायचे राहिले. त्यामुळे तिथल्या हॉटेल मालकाने आत्महत्या केली. ही बातमी खरी आहे की खोटी आहे हे माहिती नाही. ते (शिंदे गट) दर्शनाला जात आहेत. काही ठीकाणी आपण बकरा कापतो, काही ठिकाणी कोंबडं कापतो. तासा तिथे (गुवाहाटी) रेडा कापतात म्हणतात. रेड्याचा बळी देतात. त्यामुळे हे कुणाचा बळी द्यायला चालले माहिती नाही.”

या भेटीदरम्यान शिंदे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि गुवाहाटीचे पोलिस आयुक्त यांची भेट घेणार आहेत. जून महिन्यात शिंदे आसाममधील राजकीय घडामोडींमध्ये मदत करणाऱ्या लोकांची भेट घेणार आहेत. या दौऱ्यात शिंदे यांच्याकडून कामाख्या देवीच्या मंदिरात विशेष पूजेचे नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हा दौरा आमदारांना जोडण्यासाठी आहे की रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार मार्गी लावण्यासाठी आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.