Ajit Pawar | संजय राऊतांना कोणी अधिकार दिला? अजित पवारांनी राऊतांचे कान टोचले

Ajit Pawar | मुंबई: आज राज्यामध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार कोणत्याही क्षणी महाविकास आघाडीतून बाहेर पडतील अशा चर्चांना राजकीय वर्तुळात सुरू होत्या. अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार यामुळे सर्वांचं लक्ष अजित पवार यांच्याकडे लागलं आहे. अशात अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीत – अजित पवार (Will stay in NCP as long as there is life – Ajit Pawar)

माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, “शरद पवारांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली होती. पक्षामध्ये आजपर्यंत अनेक चढउतार आले. मात्र, पक्षाबद्दल आणि आमच्याबद्दल जाणीवपूर्वक बातम्या पसरवल्या जात आहे. जीवात जीव असेपर्यंत आम्ही राष्ट्रवादीतच राहणार आहोत.” “40 आमदार मला भेटायला आले होते, त्याचा वेगळा अर्थ काढू नका” असे देखील पवार या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले.

पवारांनी राऊतांना नाव न घेता लगावला टोला (Ajit Pawar criticized Sanjay Raut without naming him)

पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. पवार म्हणाले, “माझ्याबद्दल आणि पक्षाबद्दल जाणीवपूर्वक बातम्या पसरवल्या जात आहे. राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हे केलं जात आहे. बाहेरच्या पक्षाचे काही लोक आमच्या पक्षाचं प्रवक्ते पद घ्यायला लागले आहे. तुम्ही ज्या पक्षाचे आहात त्याबद्दलच बोला. आमच्याबद्दल तुम्ही बोलू नका कारण आम्ही आमची भूमिका मांडायला सक्षम आहोत.” तुम्ही आमचं वकीलपत्र घेऊ नका, असं म्हणतं अजित पवारांनी संजय राऊतांना नाव न घेता टोला लगावला आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या फेसबुक आणि ट्विटर वॉलपेपरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह त्यांचा फोटो होता. सोशल मीडियावरून राष्ट्रवादी पक्षाचा फोटो हटवल्यानंतर पवार भाजपामध्ये प्रवेश करणार या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांना पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये पूर्णविराम दिला.

महत्वाच्या बातम्या