Ajit Pawar | “सत्ताधारी लोकांच्या सुरू असलेल्या चौकशींना क्लीनचीट आणि…” ; अजित पवारांना शंका

Ajit Pawar | मुंबई : मुंबई पोलिसांच्या EOW टीमने INS विक्रांत विमानवाहू युद्धनौका वाचवण्यासाठी गोळा केलेल्या निधीच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांना क्लीनचिट दिली आहे. यासोबतच टीमने या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्टही कोर्टात दाखल केला आहे. एप्रिलच्या सुरुवातीला, ट्रॉम्बे पोलिसांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाविरुद्ध क्राउडफंडिंगद्वारे गोळा केलेल्या सुमारे ५७ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला होता. दरम्यान यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर त्यांना क्लीनचीट देण्यात आली आहे. यातून सत्ताधारी बाजूच्या लोकांच्या सुरू असलेल्या चौकशींना क्लीनचीट मिळायला लागली आणि विरोधी बाजूच्या लोकांच्या चौकशी पूर्ण झाली असतानाही त्या रीओपन करण्याचा प्रयत्न होतो. हे राजकीय सूडभावनेने होत आहे अशी शंका सर्वसामान्यांना आल्याशिवाय राहणार नाही”, असे अजित पवार म्हणाले म्हणाले.

दरम्यान पोलिसांच्या अहवालानुसार या प्रकरणाच्या तपासात कोणताही गुन्हा आढळून आलेला नाही. तसेच सोमय्या यांचा कोणाचीही फसवणूक करण्याचा हेतू नव्हता असे आढळून आले. या मोहिमेसाठी २,००० रुपयांची देणगी देणारे ५३ वर्षीय माजी सैनिक बन भीमराव यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.

सरकार बदलेल तेव्हा सर्वांचा हिशोब पूर्ण केला जाईल – 

या प्रकरणावर संजय राऊत म्हणाले, “आम्ही त्याच्याकडे पाहत नाही. सरकार बदलल्यावर अशा अनेक गोष्टी अपेक्षित असतात. त्यातलीच ही एक गोष्ट आहे. याचा अर्थ तो विषय संपलेला नाही. विक्रांत संदर्भात पैसै गोळा झाले आहेत. हे सर्वांनी पाहिले आहे. मग तो एक रुपया असेल किंवा ५० कोटी असतील. पैशाचा अपहार हा झालेला आहे. पैसे राजभवनात गेले असे म्हणतात. मात्र राजभवन म्हणते पैसे आले नाहीत. हाच सर्वात मोठा पुरावा आहे. जरी आज सोमय्यांना क्लीन चिट मिळाली असेल. तर २०२४ ला हे प्रकरण समोर येणार नाही, असे नाही. सरकार बदलेल, कोणतेही सरकार कायमस्वरूपी नसते. सरकार बदलेल तेव्हा सर्वांचा हिशोब पूर्ण केला जाईल.”

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed.