Ajit Pawar | सुप्रिया तू बोलू नकोस, तुझा मोठा भाऊ म्हणून अधिकारवाणीने सांगतो- अजित पवार

Ajit Pawar | मुंबई : आज (2मे) मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच प्रकाशन करण्यात आलं. त्यावेळी या कार्यक्रमाला शरद पवारांच्या पत्नी, जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे ( Supriya Sule) आदी नेतेमंडळी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तर शरद पवार यांनी प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषण करताना एक मोठी घोषणा केली. त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली.त्यानंतर सभागृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला. तर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सुप्रिया तू बोलू नको : अजित पवार ( Ajit Pawar on supriya sule)

तसचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गोंधळ करत असलेल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना गप्प बसण्याचं आवाहन देखील केलं. तरीदेखील नेते, कार्यकर्ते शांत होताना दिसत नव्हते. अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड या सर्व नेत्यांनी विनंती करूनही त्यांनी हा निर्णय मागे न घेतल्यामुळे कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांना शरद पवारांची समजूत घालावी अशी विनंती केली. त्यावर ‘सुप्रिया तू बोलू नको’, मोठा भाऊ म्हणून अधिकारवाणीने सांगतोय, असं सुप्रिया सुळेंना अजित पवारांनी सांगितलं. यावर फक्त सुप्रिया सुळे ( Supriya Sule) समोर बसून बघत होत्या. तसचं पक्षाचा पुढचा अध्यक्ष कोण असणार यासाठी एक समिती नेमण्यात येणार आहे. समितीच्या निर्णयानुसार पुढचा अध्यक्ष ठरवण्यात येणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, पवार साहेबांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी त्यांना विनंती देखील केली. त्यावेळी उपस्थित असणारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि इतर सर्व नेते भावुक झाले. यावेळी काही नेत्यांना कार्यकर्त्यांना अश्रु अनावर झाले होते. तर कार्यकर्त्यांनि पवारांना हा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत सभागृहातुन बाहेर जाणार असं देखील म्हटलं. याचप्रमाणे संजय राऊत यांनी देखील ट्विट करत पवारांच्या निर्णयाबाबत भाष्य केलं आहे. तसचं त्यांनी शिवेसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा दाखला देत राऊतांनी शरद पवारांची काय मानसिकता असेल हे सांगण्याचा प्रयत्न ट्विटमधून केला आहे.

महत्वाच्या बातम्या-