Ajit Pawar | “सोशल मीडियावर व्हायरल क्लिपमुळे…” ; महाराष्ट्रात झालेल्या दंगलीप्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया
Ajit Pawar | मुंबई: राज्यामध्ये अकोल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे जोरदार दंगली झाल्या. काल छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शेगाव शहरात मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये जोरदार दगडफेक झाल्याचं दिसून आलं आहे. या दगडफेकीमध्ये चार पोलीस जखमी झाले आहे. या सर्व प्रकरणावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या दंगली प्रकरणी प्रतिक्रिया देत अजित पवार म्हणाले, “सोशल मीडियावर काही क्लिप व्हायरल झाल्या होत्या. या व्हिडिओमध्ये काही समाजाच्या भावना दुखावल्या जात होत्या. हे व्हिडिओ बघून एक ग्रुप अतिशय अग्रेसिव्ह झाला. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये दंगली सुरू झाल्या. राज्य सरकारने या दंगलींना आवर घातला पाहिजे. कारण राज्यातील कायदे आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचे काम राज्य सरकारचे आहे.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “हे व्हिडिओ सोशल मीडियावर कुणी व्हायरल केले? याची शहानिशा राज्य सरकारने केली पाहिजे. त्याचबरोबर या क्लिप व्हायरल करण्यामागे मास्टरमाईंड कोण होता? याकडे देखील राज्य सरकारने लक्ष द्यायला हवे. त्याचबरोबर या सर्व प्रकरणामध्ये राज्य शासनाने पोलिसांना त्यांच्या पद्धतीने काम करू द्यावे.”
दरम्यान, या सर्व प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “दंगलींवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होत आहे. या दंगली जाणीवपूर्वक घडवल्या जात आहे. सध्या दोन्ही ठिकाणी पूर्णपणे शांतता आहे. त्याचबरोबर पोलीस अलर्ट मोडवर आहे, त्यामुळे कुठेही अनटोल्ड इन्सिडेंट होणार नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis | “या दंगली जाणीवपूर्वक…” ; महाराष्ट्र दंगली प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
- Nitesh Rane | नाना पटोले यांना काँग्रेसचा अपमान मान्य आहे का? नितेश राणेंचा नाना पटोले यांना खडा सवाल
- Sanjay Raut | मी कारवाईला घाबरत नाही; नाशिकमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत संजय राऊत यांचं ट्विट
- Sharad Pawar | राष्ट्रवादीला मोठा धक्का! पवारांच्या ‘या’ खास नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश
- Nitesh Rane | महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची अवस्था सरदारासारखी; नितेश राणे यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
Comments are closed.