Ajit Pawar | “हा संपूर्ण विधिमंडळाचा अपमान”; अजित पवारांनी राऊतांना ठणकावलं

Ajit Pawar |  मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, आज संजय राऊतांच्या वक्तव्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विधानसभा सभागृहाचा आजचा दिवस हा संजय राऊतांच्या वक्तव्याने चांगलाच गाजला आहे. खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख ‘चोरमंडळ’, असा केल्याने सत्ताधाऱ्यांनी विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करत हक्कभंगाची मागणी केली आहे. राऊतांच्या वक्तव्यावरुन राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या याचं वक्तव्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील राऊतांना ठणकावलं आहे.

“हा संपूर्ण विधिमंडळाचा अपमान”- (Ajit Pawar)

“मी सभागृहात म्हणणं मांडत असताना हाही मुद्दा मांडला की, बऱ्याचदा कधीकधी चॅनलवर बातमी दाखवत असताना थोडसं समज-गैरसमज होतात. त्यामुळे शहनिशा करा. वस्तुस्थिती काय आहे ते विचारा. वस्तुस्थिती तशी असेल तर नियम, कायदे, संविधान हे सगळ्यांसाठी सारखे आहेत. त्यामुळे कुणाला वेगळी ट्रिटमेंट देण्याचं कारण नाही. हा संपूर्ण विधिमंडळाचा अपमान आहे. आम्ही 288 प्रतिनिधी ते काम करत असतो. दोन्ही सभागृहाच्या सदस्यांचा हा अपमान आहे. ते बरोबर नाही”, असे अजित पवार म्हणाले आहेत.

“लोकशाहीत काम करणाऱ्या व्यक्तीने असं वक्तव्य करणं पटतच नाही”

“पार्लमेंटमध्ये प्रतिनिधी करत असणाऱ्या आणि लोकशाहीमध्ये काम करत असणाऱ्या व्यक्तीने अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे पटतच नाही. अशा प्रकारची गोष्ट कधीही होता कामा नये, असं माझं म्हणणं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. कोणीही या गोष्टीचं समर्थन केलं नाही. फक्त कुणावर कारण नसताना अन्याय होऊ नये. पण कुणी चुकलेलं असेल तर त्या व्यक्तीच्या विरोधात जो काही योग्य निर्णय असेल तो घेतला जावा”, अशी स्पष्ट भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे.

Ajit Pawar talk on Sanjay Raut’s statement 

“आता विशेष हक्क समिती आज स्थापन करण्यात आली. आम्हाला तीन नावे मागितली. काँग्रेसला दोन नावे मागितली. इतर नावे सत्ताधारी आणि मित्रपक्षाकडून नावे जातील. समिती स्थापन करुन विशेष हक्क समितीकडे हे प्रकरण जाईल, अशी शक्यता आहे”, असे अजित पवार म्हणाले आहेत.

“विशेष हक्क समिती शहानिशा करेल”

“अजून विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेलं नाही. त्यांनी दोन दिवसांत तपास करुन निर्णय देतो, असं सांगितलं आणि यासाठी तारीख 8 मार्च सांगितली. त्यामुळे नक्की कधी सांगणार? याबाबत जम्बलिंग झालं आहे. कदाचित 8 तारखेला निर्णय घेतील. विशेष हक्क समिती शहानिशा करेल आणि नंतर सभागृहात निर्णय मांडेल. त्यानंतर सभागृह निर्णय घेईल, असं मला वाटतं”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.