Ajit Pawar | “ही सगळी नाटकं सुरू आहेत, अजित पवार भाजपसोबत येणार नाही” ; भाजप खासदाराचं स्पष्टीकरण

Ajit Pawar | अमरावती: गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. ही सगळी नाटकं सुरू आहे, अजित पवार भाजपसोबत येणार नाही, असं अनिल बोंडे म्हणाले आहे.

अनिल बोंडे म्हणाले, “सगळे एकापेक्षा एक आहे. अजित पवार काही भाजपसोबत जाणार नाही. एकदा नाही तर दोन वेळा ही नाटकं झाली आहे. पहाटेच्या शपथविधीलाही हे झालं होतं. भाजपने एकदाही अजित पवारांना पक्षांमध्ये या असं म्हटलं नाही. जनतेमध्ये संभ्रम पसरवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत आहे.”

शरद पवार यांच्या राजीनाम्यावर देखील अनिल बोंडे यांनी भाष्य केलं आहे. “राजीनामा दिल्यानंतर पहिल्या दिवशी बारा कोटी महाराष्ट्रातील लोकांपैकी पाचशे सहाशे लोक रडायला आणि घोषणा द्यायला लागले. शेवटी पवारांनी राजीनामा मागे घेतला. ही एक प्रकारची नौटंकीच होती असं अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे.

रिफायनरी प्रकल्पाला विरोध करत असलेल्या लोकांची मतं जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहे. त्याबद्दल प्रतिक्रिया देताना अनिल बोंडे म्हणाले, “कोणताही प्रकल्प राज्यात आला तरी काही लोक त्याला विरोध करतात. राजकारणासाठी आणि स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. रिफायनरी प्रकल्पासाठी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी पत्र दिलं होतं आणि आता ते त्याला विरोध करत आहेत.”

महत्वाच्या बातम्या