Ajit Pawar । “जे लाव रे तो व्हिडीओ म्हणायचे, त्यांचे..”; अजित पवारांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
Ajit Pawar । पुणे : राज्याचे विधासभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. चंद्रकांत पाटील एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले असता त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचं ‘राष्ट्रवादी पुन्हा’ हे गाणं वाजवणाऱ्या डीजेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यावर बोलताना अजित पवारांनी याच चुकीचं काय झालं? असा उलट प्रश्न केला आहे.
मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी असे वाद उकरून काढले जातात, असंही अजित पवार म्हणाले. या वादांमुळे महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे का? असा सवाल अजित पवारांनी केला. यावेळी पत्रकारांनी ‘लाव रे ते गाणं’ अशा चर्चा झाल्या असल्याचं सांगितलं. अजित पवारांनी त्यावरून राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं नाव न घेता त्यांच्यावर खोचक शब्दांत टोला लगावला. “जाऊ द्या आता.. जे म्हणायचे लाव रे तो व्हिडीओ त्यांचे काही महिन्यापूर्वी किंवा वर्षांपूर्वीचे विचार काय होते आणि आता काय आहेत ते बघा. आता काय, कुणाबद्दल न बोललेलंच बरं”, असं अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले.
महापालिकेच्या मिळकत करासंदर्भात त्यांना विचारण्यात आलं. यावर ते म्हणाले, यंदाच्या निवडणुकीत घड्याळ चालवा. मी दोन मिनिटांत प्रश्न सोडवतो. शिंदे, फडणवीस सरकारमधील कोण नाराज आहे, मला माहिती नाही. जर कार्यक्रमात राष्ट्रवादीच गाणं वाजलं तर बिघडलं कुठं. कधी कधी एखाद्या कार्यक्रमात होतं. एवढं त्याला महत्त्व देण्याची गरज नाही, असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
दरम्यान, राज्यात परतीच्या पावसानं मोठा धुमाकूळ घातला. यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर त्यांना मदतीचा हात मिळावा यासाठी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा असा पुनरुच्चार विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.
महत्वाच्या बातम्या :
- Rohit Pawar । “…ही भाजपची काम करण्याची पद्धत”; ‘त्या’ प्रकरणावरून रोहित पवार यांचा हल्लाबोल
- Tata AirBus Project । शिंदे-फडणवीस सरकार गुजरातचे एजंट; नाना पटोले यांची बोचरी टीका
- Bachhu Kadu । “उद्या राजीनामा द्यावा लागला तरी बेहत्तर, आंडूपांडू थोडीच आहे?”; ‘त्या’ प्रकरणावरून बच्चू कडू भडकले
- Chandrakant Patil | पुण्यात ‘राष्ट्रवादी पुन्हा…’ हे गाणे वाजवून केले चंद्रकांत पाटील यांचे स्वागत!
- Bachhu Kadu | “माझा इशारा फुसका बार की बॅाम्ब हे १ तारखेला समजेल”; बच्चू कडूंचा रवी राणांना इशारा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.