Ajit Pawar । राष्ट्रवादी खरंच फुटणार का?; अजित पवार म्हणाले…

Ajit Pawar । अहमदनगर : राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं दिसत आहे. शिवसेनेनंतर काँग्रेसचे देखील अनेक नेते शिंदे गटात सामील झाले आहेत. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे तब्बल 12 नेते फुटणार असल्याचा दावा केला आहे. “या सर्व नेत्यांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. पण हे 12 नेते फुटणार असल्याचं निश्चित झालंय. यामध्ये सोलापूरच्या बड्या नेत्याचा समावेश आहे”, असा धक्कादायक दावा शहाजीबापू पाटील यांनी केलाय. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, शिर्डीमध्ये सुरु असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपले पदधिकारी आणि कार्यकर्त्यांना या संबंधित महत्त्वाचा आणि मोलाचा सल्ला दिला आहे. “ते आपल्या पक्षातील लोकांना पण आमिष दाखवत आहेत. आपल्या लोकांनाही काही सांगत आहेत. पण त्यांच्या आश्वासनाला बळी पडू नका”, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “जे पक्ष सोडून गेले त्यांना आता पश्चाताप होतोय. त्यांना वाटतं जे केलं ती चूक झाली. ज्या घरात वाढलो ते घर उद्ध्वस्त करणं योग्य नाही. शिवसेनाबाबत जे घडलं, त्याने नाव गेलं, हे महाराष्ट्रातील जनतेला आवडलं नसल्याचं अजिबात पवार यावेळी बोलताना म्हणाले.

पक्षफुटीच्या दाव्याला जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डीतील चिंतन शिबिर संपल्यानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असा दावा जयंत पाटील यांनी केला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहजासहज फुटणार नाही. राष्ट्रवादी राज्यातील सर्वात मजबूत पक्ष आहे, असं जयंत पाटील म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.