Ajit Pawar | “गद्दारी करणाऱ्यांना मतदार जागा दाखविणार”; शिंदे गट अजित पवारांच्या निशाण्यावर

Ajit Pawar | परभणी : महाविकास आघाडीचे सरकार सुरळीत चालले असताना शिवसेनेच्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आणि राज्यात मोठा सत्ताबदल झाला. एखनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करुन राज्यात नवे सरकार स्थापन केले. त्यावरुन महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत बंड पुकारलेल्या ४० आमदारांवर टीकेची झोड उठवली आहे.

त्यातच आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला टीकेचे लक्ष्य केले आहे. अजित पवार एका परभणीतील एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी गद्दारांनी मतदार जागा दाखवणार असे म्हटले आहे.

“पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा खूप गाजली. लोक आम्हाला याबद्दल विचारायला लागले. अशी पद्धती लोकांना आवडत नाही. त्यामुळं लोकं वाट पाहत आहेत की, कधी निवडणुका लागतात. ज्यांनी गद्दारी केली, वेगळी भूमिका घेतली. त्यांची जागा दाखविण्यासाठी मतदार सज्ज आहेत. आता काही ठिकाणी निवडणुकीवर परिणाम व्हायला लागला”, असेही अजित पवार म्हणाले आहेत.

“गेल्यावेळी उद्धव ठाकरे यांचे उमेदवार या नात्याने लोकांनी निवडून दिलं होतं. शिंदे यांनी बंड केला. असं करता येत नाही. पण, चेंडू आता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आहे. दुसरा निवडणूक आयोगाच्या समोर आहे. हा निकाल देशाच्या सर्व निकालावर परिणाम टाकणारा राहणार आहे. यात काही घडलं तर देशात कायमची अस्थिरता राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही”, असे भाकित विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या