Ajit Pawar | “पक्षाचं काम महत्वाचं की त्या व्यक्तीचा जीव?”; अजित पवारांचा रोखठोक सवाल

Ajit Pawar | कोल्हापूर : पुणे शहरात कसबा आणि पिंपरी चिंचवडमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. कसबा आणि चिंचवडमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये निवडणुकीच्या प्रचार सभा सुरु आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे अनेक नेते पुण्यात ठाण मांडून आहेत.

भाजपचे खासदार आणि कसबा पेठ मतदार संघात 5 वेळा आमदार राहिलेले गिरीश बापट (Girish Bapat) हे प्रचारासाठी मैदानात उतरलेले दिसत आहेत. गिरीश बापट हे आजारी आहेत. त्यांना व्हीलचेअरवर आणण्यात आले. ऑक्सिजनसह ऑक्सीमीटरही लावण्यात आले असतानाही बापट हे प्रचार करताना पहायला मिळाले आहेत. त्यावरून विरोधी पक्षांनी भाजपवर टीका करायला सुरूवात केली आहे. गिरीश बापट हे आजारी असताना प्रचाराला आले. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar ) यांनी देखील यावरून भाजवर टीका केली आहे.

“पक्षाचं काम महत्वाचं की त्या व्यक्तीचा जीव महत्वाचा”

“गिरीश बापट सध्या आजारी आहेत. तरी देखील ऑक्सिजन लावून त्यांना प्रचारात उतरवलं जात आहे. आजारी माणसाला अशा पद्धतीने प्रचारात उतरवणं योग्य आहे का? पक्षाचं काम महत्वाचं की त्या व्यक्तीचा जीव महत्वाचा याचा विचार व्हायला  नको का? त्यांना ऑक्सिजन लावून प्रचाराला आणलं गेलं” ,अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.

Ajit Pawar comment on Girish Bapat campaign

“आम्ही मतदारसंघात जावून काम करत असतो. महाविकास आघाडीच्या माध्यमातून बळकटीकरण व्हावे यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे, ते आमचं कामच आहे. 27 तारखेला राज्याचे अधिवेशन आहे. त्यानिमित्ताने अनेक लोक भेटत असतात. त्यांच्या काही तक्रारी असतात, त्या तक्रारी सोडविण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे सुपुत्र आहेत. ते आमच्या पुण्यात आले आहेत. बापट यांच्या मतदारसंघात सव्वा लाखाचे मताधिक्य होतं ते त्यांनी 24 हजारापर्यत आणलं”, असे अजित पवार सांगितलं आहे.

जिथं मोठं झाला तिथं तुम्हाला एक आमदार,  खासदार निवडून आणता आले नाहीत”- Ajit Pawar

“चंद्रकांत पाटील यांचं देखील गेल्या काही दिवसांपूर्वी ऑपरेशन झालं. ते जे वक्तव्य करत आहेत ते पाहून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे का असं वाटतं. स्वतःच्या मतदारसंघात एकही जागा निवडणूक आणता आली नाही. जिथं तुम्ही मोठं झाला तिथं तुम्हाला एक आमदार, एक खासदार निवडून आणता आले नाहीत”, असा टोला यावेळी अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

चंद्रशेखर बावनकुळेंच्या टीकेवरुन पलटवार 

“440 पेक्षा मोठा करंट आहे का बघा. पाच वर्षे तुम्ही मंत्री असताना तुम्हाला पक्षाने तिकीट दिलं नाही. तुमच्या पत्नीला तिकीट दिलेलं नाही, मग कशाला बोलता? स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याबद्दल काही तरी बडबडायाचे हे योग्य नाही, असे अजित पवार यांनी यावेळी म्हटले.

“भाजपने निवडणूक मनावर घेतली” -Chhagan Bhujbal

“मी सुद्धा गिरीश बापट यांना पाहिलं नव्हतं, त्यांची आत्ता अवस्था झाली आहे. गेली अनेक वर्षे त्यांच्यासोबत काम केलं आहे. त्यांची अवस्था पाहून वाईट वाटलं. मला त्यांच्या तब्येतीबद्दल कल्पना नव्हती पण वाचनात आल्यानंतर खूपच वाईट वाटलं. त्यात भाजपला पराभव दिसू लागल्याने त्यांनी त्यानं प्रचाराला आणले. भाजपला पाठीमागच्या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने ही निवडणूक चांगलीच मनावर घेतली आहे. त्यामुळे त्यांनी गिरीश बापट यांना प्रचाराला आणलेले दिसत आहे”, असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

“मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना मतदानासाठी आणलं होतं इथपर्यंत ठीक होतं. पण आता अशा अवस्थेत प्रचाराला आणलं याचं मला फार आश्चर्य वाटलं, एखाद्या प्राण्याला असं कोण करत असेल तर आपण लगेच सांगतो की असं नको करु म्हणून पण हे तर त्यापेक्षा भयानक दिसत आहे आणि आजारी माणसाला काम करायला लावतोय, असं छगन भुजबळ यांनी भाजपला चिमटे काढले आहेत.

महत्वाच्या बातम्या-