Ajit Pawar | “प्रत्येक आमदाराला म्हणतात तुला मंत्री करु, एके दिवशी सगळेच आमदार निघून जातील”- अजित पवार

Ajit Pawar | अहमदनगर :  राज्यात शिंदे-फडणवीसांची सत्ता स्थापन होऊन ७ महिने झाले अद्यापही सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही. यावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर अनेकदा टीका करुनही मंत्रिमंडळाचा विस्तार केला नाही. आता पुन्हा एकदा राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. त्याचबरोबर आज पाथर्डीमध्ये बोलत असताना राज्यातील अनेक प्रश्नांवरुन अजित पवारांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

Ajit Pawar criticizes the state government on cabinet expansion

“प्रत्येक आमदाराला म्हणतात की, तुला मंत्री करणार. पण, मंत्रिमंडळ विस्तार केला जात नाही. असं झालं तर आमदार निघून जातील, असा इशारा अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला.

“प्रत्येक आमदाराला मंत्रीपदाचे आश्वासन कशासाठी? एका मंत्र्याकडे सहा जिल्ह्यांचं पालकत्व आहे. ४० ते ५० कोटी रुपये जाहिरातीवर खर्च केले. पाच-सहा महिन्यात ५० कोटी रुपये जाहिरातीसाठी. मुंबईत १७ कोटी रुपये जाहिरातीसाठी खर्च केले. यांच्याच जाहिराती. यांचेचं फोटो. यांचाचं उदोउदो. डबळी एसटी होती. त्याखाली फोटो होते. असे फोटो शोभतात तरी का?”, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक नुकसान

‘राज्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानाची भरपाई दिली पाहिजे. यासाठी उद्या सभागृहात आवाज उठवणार’ असल्याचं अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं आहे.

राज्य सरकारची उडवली खिल्ली

“दोन रुपयांचा धनादेश दिला. हे संबंधित अधिकाऱ्याला दाखवलं. एस. एन. जावळे हा सोलापूरचा अडतव्यापारी होता. त्याचा परवाना निलंबित करण्यात आला. तू दोन रुपयांचा धनादेश दिला. आमची बदनामी झाली म्हणून निलंबित करण्यात आलं”, असं सांगून अजित पवारांनी सरकारच्या उलट कामांची खिल्ली उडवली आहे.

महत्वाच्या बातम्या-