Ajit Pawar | “40 आमदारांना सांभाळायला निधीची उधळण, म्हणून भाजपचे 105 आमदार नाराज”- अजित पवार

Ajit Pawar | मुंबई : राज्यात विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. शिंदे-फडणवीस सरकारने आपला पहिलाच अर्थसंकल्प मांडत अनेक घोषणा केल्या. त्यानंतर आता अधिवेशनात या अर्थसंकल्पावर चर्चा होईल. ‘घोषणा केल्या, मात्र निधी कुठं आहे’, असा विरोधकांकडून सवाल करण्यात आला. यावेळी राज्य सरकारने केलेल्या घोषणांवरुन विरोधी पक्षनेते अजित पवारांनी राज्य सरकाने निधीची उधळण केल्याचा आरोप करत संपूर्ण आकडेवारी वाचून दाखवली.

“40 आमदारांना सांभाळण्यासाठी निधीची उधळण”

“40 आमदारांना सांभाळण्यासाठी निधीची उधळण सुरू आहे. 288 आमदारांपैकी केवळ 40 आमदारांचंच सरकार आहे की काय अशाप्रकारची शंका येते. यामुळे भाजपचेही 105 आमदार नाराज झाले आहेत. ते बोलत नाहीत, मात्र मागून खूप धुसफूस सुरू आहे. त्यांना फार त्रास होत आहे”, असे अजित पवार म्हणाले आहेत.

“..म्हणून भाजपचे 105 आमदार नाराज”- Ajit Pawar

“105 आमदार नाराज झालेत. त्यांना फार त्रास होत आहे. हे त्यांना सांगतात की, थांबा, दम काढा, विरोधी पक्षात बसण्यापेक्षा त्यांच्या नेतृत्वात आपलं काहीतरी बरं चाललं आहे. असं असलं तरी चांगलं चालावं म्हणून त्यांना 2024 पर्यंत थांबा म्हणून सांगत आहेत. मार्गदर्शन तर असं सुरू आहे की, या नाराज आमदारांना काही बोलूच दिलं जात नाही”, असं म्हणून अजित पवारांनी भाजप आमदारांच्या नाराजीचं कारण सांगितलं आहे.

“तुम्ही म्हणाल निधीची उधळण कशी होते. मी 1 डिसेंबर 2022 चा एक जीआर बघितला. नगरविकास विभागाने जीआर काढला की, ठाणे महानगरपालिका क्षेत्रासाठी 195 कोटी रुपयांची मंजुरी दिली. मीरा-भाईंदर 255 कोटी रुपयांची मंजुरी दिली”, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

Ajit Pawar Criticize Eknath Shinde And Devendra Fadnavis

“ठाण्यासाठीच्या या निधीपैकी संगीत कारंजे आणि सुशोभीकरण याला 50 कोटी, स्मशानभूमीत विद्युतदाहिनी आणि सुशोभीकरणाला 50 कोटी, विहिरींची साफसफाई 50 कोटी, डोंगराळ भागात सोलर दिवे बसवणे 50 कोटी रुपये, बस स्टॉप आणि ज्येष्ठ नागरिकांना कट्टा 50 कोटी, विद्यार्थ्यांसाठी उद्यानात अभ्यासिका 25 कोटी रुपये, चौकांचं सुशोभीकरण 20 कोटी, सिग्नल यंत्रणा 10 कोटी फुटपाथवर शोभिवंत रेलिंगसाठी 25 कोटी रुपये खर्च करण्यात आले”, असंही अजित पवारांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-