अजित पवार आक्रमक ; सेलिब्रिटींनां चांगलंच सुनावलं म्हणाले

मुंबई : भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला देश-विदेशातून पाठिंबा मिळत आहे, मात्र असं असलं तरी भारतातील काही सेलिब्रेटी तसेच क्रिकेटपटूंनी या आंदोलनाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातही एक आवाज उठविला जात आहे की, हा प्रश्न पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे.

रिहानासह काही परदेशी सेलिब्रेटींनी शेतकरी आंदोलनासंदर्भात भाष्य केल्यानंतर आता देशातही एक आवाज उठविला जात आहे की, हा प्रश्न पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. यामुळे यावर बोलण्याचा अधिकार फक्त भारतीय लोकांनाच मिळाला पाहिजे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही याबाबत सरकारला पाठिंबा दिला आहे.

सचिन तेंडुलकरच्या ट्वीटनंतर भारतातील अनेक क्रिकेटपटूंनी यावर ट्वीट केले आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, शिखर धवन यांनी ट्वीट केले आहे. क्रिकेपटूंनी ट्वीट केल्यानंतर #IndiaTogether हा हॅशटॅग ट्रेंड झाला आहे. तसेच अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिलीय.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे दौऱ्यावर आहेत. सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाबाबत घेतलेल्या भूमिकेवर त्यांना प्रश्न केला असता त्यांनी सेलिब्रिटींना चांगलंच सुनावलं आहे. ‘सेलिब्रिटींना माझी विनंती आहे, दोन महिने उलटून गेले शेतकरी थंडी वाऱ्याचे आंदोलनाला बसलेत. याकाळात त्यांनी मत का नाही व्यक्त केलं ? कोणी थांबवलं होतं ?’ असा सवाल त्यांनी केला आहे.

‘आता बाहेरच्या सेलिब्रिटीला वाटलं भारताच्या शेतकऱ्यांबाबत लक्ष दिलं गेलं पाहिजे, ते त्यांचं मत आहे. त्यांनी मत व्यक्त केल्यावर इथं काहींना जग यायला लागली आहे. शेतकरी थंडी वाऱ्यात बसला आहे ते दिसलं नाही का ?’ असे खडेबोल अजित पवारांनी सुनावले आहेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा