“क्या नाराजी नाराजी बोल रहे हो बार बार”; निवडणुकीबाबतच्या प्रश्नावर अजित पवार संतापले!

मुंबई : राज्यसभेच्या अनपेक्षित विजयानंतर आता भाजपचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. सहाव्या जागेसाठी झालेल्या लढतीत भाजपने सेनेचा पराभव करत विजय मिळवला. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्यानं निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे. भाजपचे ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्यसभेतील पराभवानंतर आता विधान परिषदेसाठी आघाडीने कंबर कसली आहे.

यादरम्यान या विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी रणनीती ठरली असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. अपक्षांना काही लोकांनी फोन केला, संख्या कमी पडत असल्याने अपक्षांना मदतीसाठी फोन केल्याचे पवार यावेळी म्हणाले. तसेच आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसची ट्रायडेन्ट हाॅटेलला बैठक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज अजित पवार यांना विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत पत्रकारांनी काही प्रश्न विचारले.

यावेळी अजित पवार काही पत्रकारांना कठोरपणे उत्तरं देताना दिसून आले. अपक्ष आमदारांना सर्वच राजकीय पक्षांकडून फोन केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मात्र याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी सल्ला मसलत केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी अजित पवारांना महाविकास आघाडीतील अंतर्गत नाराजीबद्दल विचारले असता, “क्या नाराजी क्या नाराजी बोल रहे हो बार बार, आमच्यात कुणीही नाराज नाही,” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा