InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

अजित पवार धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी; उलट -सुलट चर्चाना उधाण

- Advertisement -

आज राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये अर्ध्या तासापासून चर्चा सुरू आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्च सुरु झाल्या आहेत .

- Advertisement -

Loading...

अजित पवार यांनी राष्ट्रवादीशी बंडखोरी करून भाजपाशी हातमिळवणी करत मध्यरात्री उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर धनंजय मुंडे दिवसभर संपर्कात नव्हते. त्यामुळे त्यांच्या भुमिकेबाबत संशय निर्माण झाला होता. धनंजय मुंडे हे अजित पवारांचे विश्वासू मानले जातात. धनंजय मुंडे यांनी त्यांचे काका आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना सोडून राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतला तेव्हाही अजित पवारांनीच महत्त्वाची भूमिका निभावली होती. अजित पवारांच्या पुढाकारानेच ते राष्ट्रवादीत आले होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.