InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

“तुम्हाला चितपट केलं नाही तर नावच सांगणार नाही”, अजित पवारांच चंद्रकांत पाटील यांना खुले आव्हान

हिमंत असेल तर, माढ्यातून निवडणूक लढवा, नाही चितपट केलं तर नाव सांगणार नाही, असे आव्हानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.

“चंद्रकांत पाटील काहीही बरळू लागले आहेत. म्हणे यावेळी पवार साहेबांचा पराभव होणार आहे. हा बाबा स्वप्नात आहे की, बावचळून गेलाय कोणाला माहिती. ना कधी खासदारकी लढले ना आमदारकी अन् आम्हाला फुकटचे सल्ले द्यायला निघाले आहेत. त्यांनी आपली पाटीलकी सांभाळा, ती व्यवस्थित कशी राहिल हे पाहावं. उगाच काहीही गरळ ओकू नये आणि त्यांच्यात असेल हिंमत तर त्यांनी माढ्यातून लढावं. नाही चितपट केलं तर नावाचं सांगणार नाही.” असं आव्हानच अजित पवार यांना चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. पिंपरी चिंचवडमधील भोसरी झालेल्या जाहीरसभेत ते बोलत होते. 

याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणूक माढ्यामधून लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, इतिहासात पहिल्यांदाच शरद पवार यांना पराभवाला सामोरं जावं लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply