InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

बारामती काय आहे ते माहिती आहे का ? बारामतीत या तुम्हाला दाखवतोच – अजित पवार

मध्यंतरी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ‘मला पक्षाने जबाबदारी दिली तर पवारांची बारामती देखील जिंकून दाखवू’, असे विधान एका जाहीर कार्यक्रमात केले होते. यावर बारामती काय आहे ते माहिती आहे का ? बारामतीत या तुम्हाला दाखवतोच अशा शब्दात अजित पवार यांनी गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

अजित पवार म्हणाले,”बारामती काय आहे ते माहिती नाही आणि चालले बारामती जिंकायला. बारामतीच्या लोकांनी आमच्यावर निस्सीम प्रेम केलं आहे. गेल्या ५० वर्षांपासून बारामतीकर आम्हाला निवडून देत आहेत. पवार साहेबांना आणि मला बारामतीतून निवडून दिले जात आहे. असे असताना महाजन सांगतात की बारामती जिंकून दाखवू. ते एवढं सोपं आहे का? तरीही इच्छा असेल तर जरूर बारामतीत या”, असे खुले आव्हानही अजित पवार यांनी गिरीश महाजन यांना दिले.

महत्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.