अजित पवार यांना कधीही अटक होऊ शकते; भाजपाच्या या नेत्याचा गंभीर इशारा

सिंधुदुर्ग : महाविकास आघाडीतील नेते आणि काही मंत्र्यांविरोधात ईडी, सीबीआय किंवा इतर केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई केली जात आहे. यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेना नेते संजय राऊत, आमदार प्रताप सरनाईक, एकनाथ खडसे इत्यादी मोठ्या नावांचा समावेश होता.
या पार्श्वभूमीवर माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना कधीही अटक होऊ शकते, असे खळबळजनक विधान निलेश राणे यांनी केले आहे. कुडाळमध्ये घेतलेल्या पत्रकारक परिषदेत बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. तसेच, अजित पवार अजूनही जामिनावरच बाहेर आहेत, असा गंभीर इशारा त्यांनी दिलाय.
तसेच पुढे महाविकास आघाडीच्या हातातून जिल्हा बँक कधीच गेली आहे. म्हणून त्यांना अजित पवारांकडून एक्सटेन्शन मिळाले. जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकलण्यासाठी अजित पवारांनी मदत केली. आता निवडणूक होईल, तेव्हाही आम्हीच जिंकणार आहोत. पण त्यांना एवढा काळ का लागला, कारण त्यांना ती बँक टिकवायची कशी, हेच कळले नसल्याचे निलेश राणे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ निवडणूक आयोगाचा ठाकरे सरकारला मोठा दणका
- नाथाभाऊंनी भाजपाला दिला मोठा धक्का; तब्बल 21 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
- इंस्टॉलमेंट टीव्ही घेणारा मी कदाचित पहिलाच मंत्री असेन; गडकरींनी सांगितला तो किस्सा
- राज्यात कोणालाही फुकटात वीज मिळणार नाही, बिल हे भरावंच लागेल : नितीन राऊत
- अशोक चव्हाण बरोबरच बोलले, काँग्रेसमुळेच सरकार सत्तेत आहे; बाळासाहेब थोरात