InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

घड्याळाचे बटन दाबायचे नाही आणि आम्हालाच पैसे कधी मिळणार विचारता, अहो कमळाबाईला विचारा ना

आधी घड्याळाचे बटण दाबा… घड्याळाचे बटण दाबायचे नाही आणि आम्हाला पैसे का मिळाले नाही म्हणून आम्हाला विचारता… अहो त्या कमळाबाईला विचारा ना असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी पाथर्डी येथील जाहीर सभेत लगावला.

अजितदादा पवार यांचे सडेतोड भाषण सुरु असतानाच एक शेतकरी पैसे मिळत नाही अशी तक्रार करायला उभा राहिला. त्यावेळी अजितदादा पवार यांनी ही कोपरखळी केली.

जलयुक्त शिवाराचे हजारो गावे टँकरमुक्त झाली आहे असं सांगत आहेत कुठे झाली आहेत दाखवा आज पाथर्डी, शेवगावमध्ये १२३ गावात टँकरने पाणी का दिले जात आहे उत्तर द्या. या जलयुक्त शिवार कामात भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफी कशी झाली पाहिजे तर दोन महिन्यात कर्जातून शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे परंतु आज तसे होत नाही. नुसती पोकळ आश्वासनं, गाजरं दाखवून उपयोग नाही त्यासाठी काम केलं पाहिजे असा सल्लाही अजितदादा पवार यांनी दिला.

तुटपुंजी मदत देवून शेतकर्‍यांची चेष्टा का करता आहात. अन्नधान्याने पवार साहेबांनी देशाला स्वयंपूर्ण केले आणि आज देशाची काय परिस्थिती आहे. कांद्याचे वांधे करुन टाकले आहेत. एका शेतकर्‍याला कांदा विक्रीतून किती पैसे मिळाले याची पावती वाचून दाखवली. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या मृत्यूनंतर सर्वात मोठया शेतकरी जातीला अदयाप कृषीमंत्री सरकारने दिलेला नाही असेही अजितदादा पवार म्हणाले.

चारा छावण्यांबाबत सरकारने काढलेला जीआरचा समाचार दादांनी आपल्या भाषणात घेतला एखाद्या शेतकर्‍याकडे पाच सहा गुरे आहेत मग पाचच्या वर गुरे असतील तर शेतकऱ्यांनी बाकीची गुरं कुठे न्यायची. म्हणजे यांचे मंत्री राम शिंदे यांनी सांगितले तसे पाहुण्यांकडे गुरे नेवून बांधायची असेच सरकार करायला लावत आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर का उठला आहात. तो सर्वांना जगवतोय. मंत्र्यांचे कारखाने आहेत त्यांनी एफआरपी दिली का. हे कुठल्या तोंडानी सांगणार आहात असा सवालही त्यांनी केला.

या सरकारची थापेबाजी सुरु आहे. चुकीचे आदेश काढत आहेत हे वेळीच ओळखा. कसल्या लाल पिवळ्या याद्या काढता. हा सिग्नल आहे का लाल, पिवळा, हिरवा दिसला की थांबा आणि जावा हे काय चाललं आहे असा संतप्त सवालही अजितदादा पवार यांनी केला.

बजेटमध्ये जाहीर करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे अहो १६ रुपये महिन्याला सरकार देणार आहे. का चेष्टा करत आहात. अगोदर लहान लहान गाजरं दाखवत होते आणि आज मोठा गाजर दाखवला आहे अशी टीकाही अजितदादा पवार यांनी केली. हे भाजप सरकार तिजोरीत खडखडाट असताना हे आपल्याला काय देणार आहे. साडेचार चार लाख कोटीचा कर्जाचा डोंगर उभा करुन ठेवला आहे असेही आमदार छगन भुजबळ म्हणाले.

मत द्या त्यांना आणि आवाज उठवायला सांगा आम्हाला.. आम्ही आवाज उठवायला आहे का अशी विचारणा करतानाच आमच्यात धमक आहे. कामे करुन घेण्याची पद्धत होती आमच्याकडे. परंतु आज हे भाजपचे मंत्री पीेएना साहेब बोलत आहेत. असले हे मंत्री. आता या जित्राबांना घरी बसवण्याची वेळ आली आहे असा इशाराही अजितदादा पवार यांनी दिला.

Budget 2019: ‘बजेट’ मधेही झाला ‘उरी’ चा इफेक्ट; संसदेत How’s The Joshच्या घोषणा

Budget 2019: हा हंगामी ‘अर्थसंकल्प’ फक्त ट्रेलर आहे – मोदी

हा अर्थसंकल्प देशाच्या विकासाला चालना देणारा – अमित शाह

Video: संसदेत मध्येच सुरु झाला ‘मोदी.. मोदी..’चा जयघोष

आरएसएस च्या मुद्द्यावरून काँग्रेस सोबत मतभेत होऊ शकतात – आंबेडकर

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply