InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘या’ कारणाने राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगरला अजित पवारांनी भर सभेत खडसावले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना भर प्रचार सभेत अजित पवार यांनी झापल्याचा प्रकार घडला आहे. बारामतीच्या सभेत शरद पवारांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यासह इतर नेत्यांचा एकेरी उल्लेख केल्या प्रकरणी अजित पवार यांनी भर सभेत सक्षणा सलगर यांना खडसावले आहे.

साहेब असताना सक्षणा या लोकांबद्दल असं बोलत होती हे योग्य नाही. त्यामुळे आपली भारतीय संस्कृती जपून, थोड तारतम्य बाळगून बोलावं असे सांगत सक्षणा सलगरला भर सभेत अजित पवार यांनी सुनावलं. ते देशाचे पंतप्रधान आहे त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणं योग्य नाही, सुप्रिया ताई सक्षणाला जरा आवरा असे ही ते यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.