InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘ही कसली टिंगलटवाळी चालली आहे’; अजित पवारांची फडणवीसांवर टीका

- Advertisement -

शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात आज पैठण येथे संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन झाली. त्यानंतर बाळानगर येथे झालेल्या पहिल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रसेचे विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांनी सभेला संबोधित करताना फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. पूरस्थितीतही हे सरकार असंवेदनशील असून कसली टिंगलटवाळी चालली आहे, अशा शब्दात फडणवीस सरकारवर टीका केली. मंत्री गिरीश महाजन यांच्या सेल्फी वादावर बोलताना अजित पवार यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.

महाराष्ट्रावर पूरस्थिती ओढावल्यानंतर अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी तातडीने सांगली, सातारा, कोल्हापूरात काम सुरु केले. राष्ट्रवादीचे सर्वच नेते शक्यतोपरी मदत करत आहेत. पण, हे सरकार प्रचंड असंवेदनशील असल्याचे दिसून आले. पुरात माणसांचे प्राण गेले, आणि यांचे मंत्री फोटो काढत फिरले. ही कसली टिंगलटवाळी चालली आहे ? या सरकारला कसली मस्ती आहे ? असा प्रश्न पवार यांनी सरकारला विचारला.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.