InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

अजित पवारांनीही केले हात वर; संजय काकडे आता कोणाची मदत घेणार?

- Advertisement -

काँग्रेस नंतर आता संजय काकडे यांनी राष्ट्रवादीसोबत लोकसभा लढवण्याची चर्चा सुरु केली होती त्यासाठी त्यांनी अजित पार यांची भेट घेतली. त्यांनी अजित पवार यांच्याकडे लोकसभेसाठी पाठिंबा द्या अशी मागणी केली असल्याचे समोर आले आहे. मात्र, अजित पवार यांनी काकडेंचा भ्रमनिरास केला.

आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाणार आहे. त्यामुळे काँग्रेस देईल त्या उमेदवारासाठी काम करणार आहे असं म्हणत अजित पवारांनी हात वर केले आहेत. तसेच अपक्ष म्हणून निवडून आणणे अशक्य आहे असेही अजित पवार यांनी काकडेंनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

अजित पवारांच्या नकारानंतर आता संजय काकडे यांचे पुढचे पाऊल काय असेल? काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी पाठिंबा नाकारल्यानंतर आता काकडे लोकसभेसाठी कोणाची मदत घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान,  संजय काकडेंनी भाजपविरोधात जाहीर बंड केलंय. भाजपने आतापर्यंत माझा वापर करुन घेतल्याचं असेही ते म्हणाले आहे. त्यामुळे भाजपनेहि त्यांची साथ सोडल्याचे स्पष्ट झाले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.