शरद पवारांवर केलेल्या ‘त्या’ टिकेवरून अजित पवार फडणवीसांवर संतापले म्हणाले…

मुंबई : आगामी गोवा विधानसभा निवडणुकीवरून गोव्यासह महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीच्या हालचालीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व त्यांच्या मित्रांना इशारा दिला. गोव्यात राष्ट्रवादीची तृणमूल आणि काँग्रेससोबत बोलणी सुरू आहे, असे शरद पवार म्हणाले होते. यानंतर यावर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

“नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष. राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा करण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी राजकारण करायला गल्लीतच यावे लागते, हेच अंतिम सत्य आहे साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं!” असा सणसणीत टोला लगावला आहे. शरद पवारांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे म्हणत बोचरी टीका केली.

यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले. फडणवीसांच्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, प्रफुल्ल पटेल किंवा देशाच्या राजकारणात आमची भगिनी सुप्रिया सुळे हे लोक उत्तर देतील. शरद पवार यांची उंची काय आहे, त्यांचे देशपातळीवरील काम आणि आदराची भावना या सर्वांचा विचार करून नवीन पीढीने बोलायला हवे. तारतम्य पाळले पाहिजे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा