Ajit Pawar | “NCP मोठा अन् काँग्रेस लहान…”; अजित पवारांचा नाना पटोलेंना टोला

Ajit Pawar | कोल्हापूर: कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांनी उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी मोठा आणि काँग्रेस लहान भाऊ आहे, अशा शब्दात अजित पवारांनी नाना पटोले यांना डिवचलं आहे.

अजित पवारांचा नाना पटोलेंना टोला (Ajit Pawar criticizes Nana Patole)

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “आपल्याला मिळून महाविकास आघाडी मजबूत ठेवायची आहे. महाविकास आघाडीमध्ये महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी तुमची जास्त ताकद असायला हवी. पूर्वी काँग्रेसच्या जागा जास्त होत्या म्हणून राष्ट्रवादी लहान भावाची भूमिका घ्यायची. मात्र, आता काँग्रेसच्या 44 जागा आहेत आणि आमच्या 54 जागा आहेत. त्यामुळे आता आम्ही मोठा आणि काँग्रेस लहान भाऊ झाला आहे.”

पुढे बोलताना ते (Ajit Pawar) म्हणाले, “आता एक विचार असलेल्या पक्षांना एकत्र यावं लागणार आहे. कर्नाटकमध्ये जनता दल  सेक्युलरची मतं कमी झाली आहेत. तर भाजपचे मतं होते तेवढेच आहे. जेडीयुची मतं घटून काँग्रेसकडे गेल्यामुळे काँग्रेसला कर्नाटकमध्ये यश मिळालं आहे.”

नक्की काय म्हणाले नाना पटोले? (What exactly did Nana Patole say?)

नाना पटोले म्हणाले, “महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून गोंधळ निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे. मात्र, लवकरच हे प्रकरण मार्गी लागणार आहे. सर्व जागा गुणवत्तेच्या आधारावर ठरवल्या जाणार आहे. त्याचबरोबर समितीमध्ये चर्चा देखील चर्चा होणार आहे.”

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/43imOiF