InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘खायके पान बारामतीवाला’; अजित दादांना झाला पान खाण्याचा मोह

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे नेहमी त्यांच्या हटके वागण्यामुळे चर्चेत असतात. शुक्रवारीदेखील त्यांचा असाच हटके अंदाज पाहायला मिळाला. अजित पवार यांना पान खाण्याचा मोह झाला.

बारामतीच्य़ा त्या गार वाऱ्यात अजित पवार पाण खाण्यासाठी पणदरे इथल्या एका छोट्या पान स्टॉलवर थांबले. त्यांनी पान स्टॉलवर उभं राहून मस्त पान खाल्लं.  इतकंच नाही पानवाला पान बनवेपर्यंत त्यांनी त्याच्याशी जोरदार गप्पा मारल्या. तुमच्या दुकानात कोणतं कोणतं पान मिळतं? तुमचा रोजचा किती धंदा होतो?, अशी सगळी विचारपूस त्यांनी केली.

असचं काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याच्या  शिंगवे गावातील चहा बनविणारी उच्चशिक्षित उच्चशिक्षित केमिकल इंजिनिअर मुलगी रुपाली शिंदे हिच्या ‘माऊली चहा सेंटर’ला अजित पवार यांनी तंदुरी चहा पिऊन रुपालीच्या जिद्दीचे कौतूक करीत व्यवसायात चांगले यश मिळवण्याबाबत तिला शुभेच्छाही दिल्या.

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.