InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

Video: ‘केमिकल इंजिनिअर’ चहा बनविणाऱ्या मुलीच्या जिद्दीचे अजित पवारांनी केले कौतूक….

राज्यात उच्चशिक्षण घेवूनही अनेक तरुणांना चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाही. परिणामी, अनेकांनी नोकरीचा नाद सोडून शेती किंवा व्यवसायात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्यापैकीच एका उच्चशिक्षित मुलीने केमिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात पदवी घेतली असतानाही चांगली नोकरी मिळत नाही म्हणून खचून न जाता चहाचा व्यावसाय सुरू केला आहे. नाशिक येथील रुपाली शिंदे असे तिचे नाव.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे परिवर्तन यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातील दौ-यावर आहेत. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याच्या  शिंगवे गावातील चहा बनविणारी उच्चशिक्षित मुलगी रुपाली शिंदे हिच्या ‘माऊली चहा सेंटर’ला अजित पवार यांनी गुरूवारी भेट दिली. बासुंदी व तंदुरी चहा याठिकाणी प्रसिध्द आहे. त्यावेळी रुपालीच्या जिद्दीचे कौतूक करीत व्यवसायात चांगले यश मिळवण्याबाबत तिला शुभेच्छाही दिल्या.

चहा व्यवसायातून घराला आधार…

नाशिक जिल्यातील निकाड तालुक्यातील शिंगवे गावची उच्चशिक्षित केमिकल इंजिनिअर मुलीने ‘माऊली चाय कट्टा’ नावाने चहाचा व्यवसाय करते. या ‘माउली चाय कट्टा’मध्ये अजित पवार यांनी भेट दिली व त्या मुलीशी संवाद साधला. रुपाली शिंदे ही केमिकल इंजिनिअर असून तिला नोकरी मिळत नसल्याने घरच्या लोक़ांच्या मदतीने चहाचा व्यवसाय सुरु केल्याचे सांगितले. घरच्या परिस्थितीमुळे हा व्यवसाय सुरू केल्याचे तिने सांगितले. यावेळी दादांनी चहा बनविण्याची सर्व माहिती घेतली व चहाची चवही चाखली. केवळ ‘चाय पे चर्चा’ न करता त्या मुलीच्या जिद्दीचे कौतुक  करायलाही अजित पवार विसरले नाहीत.

महत्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.