पूरग्रस्तांच्या आर्थिक पॅकेजबाबत अजित पवार म्हणाले…

कोल्हापूर : राज्यात अतिवृष्टी होऊन आठ दिवस होत आले आहेत. गेल्या चार दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून ते सत्ताधारी मंत्री आणि विरोधी पक्षनेते पूरग्रस्त भागांचा दौरा करत आहे. मात्र, अजूनही पूरग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करण्यात आलेलं नाही. याबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. जोपर्यंत सर्व चित्रं स्पष्ट होत नाही, तोपर्यंत पॅकेजची घोषणा करता येत नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

त्यामुळे पॅकेजसाठी पूरग्रस्तांना अजून दोनचार दिवस वाट पाहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता लोकप्रियतेसाठी घोषणा करणार नसुन येणाऱ्या 2 दिवसात अहवाल आल्यास मदत केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यापुर्वी बोलुन दाखवलं होतं. कोकणातील तळिये गावात दरड कोसळुन झालेल्या दुर्घटनेत अनेकांना आपला जिव गमवावा लागला आहे. त्यातच अजित पवारांच्या वक्तव्यामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना पॅकेजसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागु शकते.

पावसाने कोकण व पश्चिम महाराष्ट्राला चांगलंच झो़डपुन काढलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संबंधी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच नागरिकांना आधारदेखील दिला आहे. पुरामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचं नुकसान झालं आहे. तर आता या नुकसानग्रस्त भागाला पॅकेज कधी जाहीर होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा