InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

घड्याळ…घड्याळ… म्हणत सभेमध्ये आलेल्या भाजप प्रचार वाहनांवर अजित पवारांनी शाब्दिक फटकेबाजी

माळेगांव येथे अजित पवार यांची प्रचार सभा सुरू असताना भाजपचा प्रचार करणारी वाहने त्या ठिकाणी पोहचल्यावर भाषणात अडथळा येऊन देखील पवार यांनी केलेल्या शाब्दिक फटकेबाजीमुळे उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ उडाला.

अजित पवार काय म्हणत आहेत हे ऐकायला ते आले आहेत. अरं.. अजित पवार बोलतो ते ऐकल्यावर तू सुद्धा घड्याळाचं बटण दाबशील. माईकवर पण तू सांगशील आता ती नको घड्याळ ..घड्याळ… घड्याळ… एवढा बावचाळून जाशील, अशा शब्दात पवार यांनी त्यांच्या ग्रामीण शैलीत केलेली फटकेबाजी सभेच्या ठिकाणी चर्चेचा विषय ठरली.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.