अजित पवार शांत राहून काम करतात, जाहिरात करत नाहीत; नाना पाटेकरांकडून कौतुकाची थाप

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांनी स्तुतिसुमनं उधळलीत. अजित पवार जेवढी कामं करतात त्याची जाहिरात कधीच करत नाहीत, असं कौतुक अभिनेते नाना पाटेकर यांनी केलंय. ‘अजित पवार हे खरोखरच एक चांगले नेते आहेत. अजित पवार खूप काम करतात, पण जाहिरात करत नाहीत,’ असं नाना पाटेकर म्हणाले.

यावर बोलताना पाटेकर म्हणाले कि, माध्यमांकडून एखादी कुठली तरी चुकीची गोष्टच अधोरेखित केली जाते. मात्र त्यांनी केलेले काम समोर आणा. ते एक चांगले पुढारी आहेत, अशा शब्दात नाना पाटेकर यांनी अजितदादांचे कौतुक केले आहे. याउलट सरकारने केलेल्या कामाना जेवढी प्रसिद्धी मिळत नाही. याउलट आम्ही अगदी छोटंसं काम केले तरी खूप प्रसिद्धी मिळते, असेही नाना म्हणाले.

तसेच राजकीय घडामोडींवरही त्यांनी भाष्य केले. पक्षांतरावरही त्यांनी आपले मत मांडले. विरोधपक्षातील लोक ही आपणच निवडून दिले आहे.तसेच पक्ष बदलणाऱ्या माणसाला पाच वर्षे कोणतेही पद देऊ नका. मग कोणीही पक्ष बदलणार नाही.काहीतरी नियम असायला हवेत. किमान शिक्षणाची अट हवी, अशी भूमिका नाना यांनी मांडली.

यावेळी पुण्यातील विधानभवनात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा करोना आढावा बैठक सुरू आहे. या बैठकीपूर्वी नानांनी अजितदादांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, नियम पाळतो म्हणजे उपकार नव्हे कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या काळात कोविडचे नियम सर्वांनी पाळायला हवे. नियम पाळतो म्हणजे स्वतःवरच उपकार करत आहोत, असंही नाना यवबेली म्हणले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या