InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

राज ठाकरेंना कुणाच्याही स्क्रिप्टची गरज नाही – अजित पवार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर, त्यांनी भाजपच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले आहे. आता राज ठाकरे राज्यभरात भाजपविरोधात सभा देखील घेणार आहेत. त्यामुळे भाजपकडून राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

राज ठाकरेंवर भाजपकडून होणाऱ्या टीकेला पाहून, आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे राज ठाकरेच्या बाजूने मैदानात उतरले आहेत.

राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे आहेत, त्यांना कुणाच्याही स्क्रिप्टची गरज नाही. भाजपच्या विरोधात बोलल्याने आता विनोद तावडे पोपटासारखे बोलायला लागले असे वक्तव्य अजित पवारांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.