InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

अजित पवार लवकरच जेलमध्ये जातील; दानवेंनी दिले संकेत

सिंचन घोटाळ्यात आरोपी असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार लवकरच जेलमध्ये जातील असे संकेत भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये त्यांना त्याबाबत जेव्हा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिलं.

सिंचन घोटाळ्यात गेली काही वर्ष अजित पवारांची चौकशी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर दानवे यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालंय. अजित पवारांची माहिती या आधीच बंद पाकिटात दिली आहे  त्यामुळे ते जेल जातील असंही दानवे म्हणाले.

या आधी २७ नोव्हेंबर २०१८ ला लाचलुचपत विभागानं राष्ट्रवादीचे नेते आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवारांवर ठपका ठेवला आहे. या घोटाळ्यात अजित पवारच जबाबदार असून त्यांनी पदाचा गैरवापर केल्याचा दावा या विभागानं प्रतिज्ञापत्राद्वारे कोर्टात केला होता. लाचलुचपत विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांनी नागपूर हायकोर्टात हे प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply